Premium|James Bond: जिच्याशिवाय बॉन्डची कामगिरी अपूर्ण अशी रफ ॲण्ड टफ बॉन्ड गर्ल कोण.?
बॉन्ड गर्ल|प्रसाद नामजोशी
पॅमेला साकारण्यासाठी अमेरिकी मॉडेल आणि अभिनेत्री कॅरी लोवेल हिची निवड झाल्यानंतर तिनं आधी सगळे बॉन्डपट बघितले, तिच्या पूर्वीच्या बॉन्ड गर्ल्सचा अभ्यास केला. आणि नुसती ग्लॅमरस बॉन्ड गर्ल साकारण्याऐवजी तिनं धडाडीची, बॉन्डला त्याच्या कामगिरीत बरोबरीनं मदत करणारी आणि जिच्याशिवाय बॉन्डची कामगिरी पूर्ण होऊ शकणार नाही अशी रफ ॲण्ड टफ बॉन्ड गर्ल साकारण्याचा निश्चय केला.
जेम्स बॉन्ड हा ब्रिटिश गुप्तहेर, एमआय सिक्स ही ब्रिटिश गुप्तहेर संघटना. त्यामुळे बॉन्डची कामगिरी दाखवणारा चित्रपट लंडनशी संबंधित असणं अपेक्षित असतंच. बॉन्डपट कुठलाही असो, जेम्स बॉन्ड जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन हाणामारी करून विविध देशांच्या सुंदऱ्या कनवटीला लावून सुखरूप परत येतोच. त्याच्या कामगिरीवर एमआय सिक्सचं लक्ष असतंच. बॉन्डपट ‘ब्रिटिश’ असावा असा पहिल्यापासूनच सगळ्यांचा प्रयत्न होताच.
मात्र १९८९मध्ये आलेला बॉन्ड मालिकेतला सोळावा चित्रपट लायसन्स टू किल हा बॉन्डपट ब्रिटनमध्ये चित्रित न झालेला पहिलाच चित्रपट ठरला! याचं कारणही मजेदार होतं. १९८५मध्ये ब्रिटनच्या संसदेत एक कायदा पास झाला. त्यामध्ये ज्याला एडी लेव्ही म्हणत तो चित्रपटांवर लावला गेलेला टॅक्स रद्द करण्यात आला.
पण त्याचा दुसरा परिणाम असा झाला, की परदेशी कलाकारांवर जास्त आयकर बसण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे आपलं आर्थिक गणित नीट बसावं म्हणून इऑन फिल्म्स या बॉन्डपटांच्या निर्मात्यांनी यावेळेचा चित्रपट संपूर्णपणे परदेशात चित्रीत करायचा निर्णय घेतला!