

Jinlin Impact Crater China
esakal
डॉ. श्रीकांत कार्लेकर
चीनमधील जिनलिन आघात विवराबद्दलचे निष्कर्ष जगभरातील, विशेषतः उष्ण व दमट उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण कटिबंधीय भागातील अशा विवरांच्या अभ्यासासाठी फारच उपयुक्त आहेत. पृथ्वीच्या अलीकडील भूगर्भीय इतिहासात आपल्याला पूर्वी माहीत असलेल्या घटनांपेक्षा अधिक नाट्यमय घटना घडल्या असाव्यात, असे या विवराचा अभ्यास दर्शवितो.
दक्षिण चीनच्या ग्वांगडोंग प्रांतात जिनलिन नावाचे आघात विवर (Impact Crater) आहे. याचे वैशिष्ट्य असे, की हे विवर ११,७०० वर्षांपूर्वी तयार झाले आणि आजपर्यंत अस्तित्वात आहे. जिनलिन हे होलोसिन या भूशास्त्रीय काळातील पृथ्वीवरील सर्वात मोठे ज्ञात विवर असल्याचे आता सिद्ध झाले आहे, असे चायना ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग फिजिक्सने (सीएईपी) अलीकडेच जाहीर केले आहे.