Premium|Jodhpur Family Trip : निवांत गप्पा आणि मेहरानगढची भव्यता; जोधपूरमधील एका कौटुंबिक सहलीचा सुखद अनुभव

Jodhpur Family Vacation Experience : जोधपूरच्या निळ्या शहरात सहलीसाठी गेलेल्या एका कुटुंबाने मेहरानगढ किल्ल्याचे ऐतिहासिक सौंदर्य न्याहाळत, वणवण भटकंती करण्याऐवजी निवांत गप्पा आणि कौटुंबिक आरामाला प्राधान्य देत एक संस्मरणीय आणि आनंदी सुट्टी साजरी केली.
Jodhpur Family Trip

Jodhpur Family Trip

esakal

Updated on

सुजाता आ. लेले

आम्ही जोधपूरमध्ये जिथे राहत होतो, ते ठिकाण गावापासून दूर आणि ऐसपैस होते. त्यामुळे बाहेर कुठेतरी फिरण्यापेक्षा आम्ही तिथेच मॉर्निंग वाॅक, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतरची शतपावली करत होतो. चालायला आणि निवांत गप्पा मारायला तिथे भरपूर जागा होती. माझ्यासाठी तरी सहलींचे मुख्य ध्येय म्हणजे आराम करणे आणि कुटुंबासमवेत निवांत वेळ घालवणे.

कुठेतरी आराम करायला जाऊ या, तिथे गेल्यावर वणवण भटकंती न करता छानपैकी आराम करू या, असा विचार करत ठिकाण निवडण्यासाठी आम्ही आख्खा भारत डोळ्यांखालून घातला! समुद्र नको, अतिथंड प्रदेशही नको... अखेर जोधपूरला जायचे ठरवले, तेही फक्त आराम आणि गप्पांचा मनमुराद आनंद लुटायला. एक आनंदी आणि निवांत कौंटुबिक सहल करायची, पण मेहरानगढ मात्र बघायचाच, असे आम्ही एकमताने ठरवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com