Premium|American Puritanism History : अमेरिकन राष्ट्रवादाचे 'धार्मिक' मूळ; जॉन विन्थ्रॉप आणि 'अ सिटी ऑन अ हिल'चा रंजक इतिहास!

Christian Charity and Politics : अमेरिकेतील 'प्युरिटन' ख्रिस्ती पंथाचा इतिहास, 'A City on a Hill' ही संकल्पना आणि अमेरिकन राष्ट्रवादाच्या मुळाशी असलेल्या धार्मिक संघर्षाचे विश्लेषण.
American Puritanism History

American Puritanism History

esakal

Updated on

डॉ. सदानंद मोरे

अमेरिकेतील या वसाहतीकांना ते इंग्लंडच्या राज्याचाच भाग असल्यामुळे इंग्लंडच्या पार्लमेंटची व राजाची सत्ता मान्य होती व त्यांचे नियम तसेच आदेशही बंधनकारक होते. त्यामुळे खरा प्रश्न संयुक्त संस्थाने या नावाने स्वतंत्र देश म्हणून जगासमोर आल्यानंतरच्या काळात अमेरिकेत धर्मासंबंधी काय घडले, त्याचा संबंध आजच्या घटितांशी लावता येतो का?

ज्या धर्म-पंथाच्या चिथावणीमुळे आपल्याला इंग्लंड सोडायची वेळ आली त्याच्याविषयी विन्थ्रॉपला काय किंवा त्याच्या सहकाऱ्यांना काय किंवा अगदी वारसदारांनासुद्धा काय, सहानुभूती वाटणे शक्यच नव्हते. निदान त्या काळात जारी असलेल्या पंथयुद्धाच्या प्रत्यक्ष पार्श्वभूमीवर तरी! आणि अशीच काही भूमिका धर्माच्या अन्य पंथांविषयीही सिद्ध होणार हेदेखील सरळ स्पष्ट आहे. आपला प्युरिटन पंथीय संदेश घेऊनच आपण अमेरिकेत जाणार व तेथे व्यापक अर्थाने नवे जग (New World) आणि नवे इंग्लंड (New England) उभारणार - जुने जग अर्थात रोमन कॅथलिक आणि त्या पंथाचे वर्चस्व वाढलेले (जुने इंग्लंड) यांच्या विरोधात अशीच विन्थ्रॉपची प्रतिज्ञा होती. वसाहत करण्यासाठी त्याने जी कंपनी स्थापन केली तिचे नाव ‘न्यू इंग्लंड’ असे होते. तिच्या आरमारी काफिल्यात स्वतः विन्थ्रॉपच्या आर्बेलासह ११ गलबतांचा समावेश होता. अर्थात, इंग्लंडच्या अशा वसाहतींचा सिलसिला याआधीच स्थापन झाला होता. पूर्वेला भारतादी देशांत आलेली ईस्ट इंडिया कंपनी ही अशा कंपन्यांपैकीच एक! या कंपन्या अर्थातच भागभांडवलावर म्हणजेच शेअरवर अवलंबून असत. त्यासाठी त्या ज्या देशात जातील तेथे वसाहती स्थापण्यासाठी रॉयल चार्टर वगैरे सोपस्कार करावे लागत. ते विन्थ्रॉपने अर्थातच केले. एरवी आपल्या विरोधातील ही ब्याद परस्पर देशाबाहेर चाललीय तर जाऊ द्या अशीच राजसत्तेचीही धारणा असणारच! दरम्यान, राजा चार्ल्सने पार्लमेंटच बरखास्त करून आपली सत्ता अधिक बळकट केली, ज्यामुळे कॅथलिकांना अधिक बळ मिळणार होते. आता विन्थ्रॉप मागे फिरणे शक्यच नव्हते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com