
मिलिंद देसाई
बेळगाव शहर परिसरात अनेक उद्योजक आहेत. या उद्योजकांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र, शहरात महिला उद्योजकांची संख्या अतिशय कमी आहे. उच्चशिक्षण घेतल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रांत नोकरी करण्यावर महिला भर देतात, मात्र स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक महिला पुढे येत नाहीत. काही महिला व्यवसाय सुरू करतात, पण व्यवसाय सुरू ठेवण्यात आलेल्या आर्थिक अडचणींमुळे अनेकींना व्यवसाय बंद करावा लागतो. अशा महिलांसाठी ज्योत्स्ना पै यांचे कार्य प्रेरणादायी ठरत असून, त्यांनी बेकरी क्षेत्रात केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे.