Premium|Golden Era of Hindi Cinema : ‘ज्योति कलश’ची मोहिनी...

Mubarak Begum Song : केदार शर्मा, स्नेहल भाटकर आणि मुबारक बेगम यांच्या कलात्मक संगमातून जन्मलेल्या ‘कभी तन्हाइयों में यूँ हमारी याद आएगी’ या अजरामर गीतामागील रंजक इतिहास आणि सुवर्णकाळाचा मागोवा.
Mubarak Begum Song

Mubarak Begum Song

esakal

Updated on

सुलभा तेरणीकर

एकेकाळचे बुजुर्ग केदार शर्मा हमारी याद आएगीसारखा चित्रपट स्वतःच्या मुलाला हिरो करण्यासाठी काढतात, आणि नवख्या तनुजाला त्या चित्रपटाची नायिका करतात आणि भजनीबुवा, अभंग गाणाऱ्या स्नेहल भाटकरांना संगीत द्यायला बोलावतात आणि लतादीदी उपलब्ध नाहीत म्हणून मुबारक बेगम नावाच्या धडपडणाऱ्या गायिकेला एक संधी देतात, तेव्हा काय घडतं? तेव्हा ‘कभी तन्हाइयों में यूँ हमारी याद आएगी’सारखी गाणी निर्माण होतात, अजरामर होतात...

भारतीय चित्रपट कृष्णधवल-रजत पटावर झळकत होते. रंगीत चित्रपटही मधूनमधून झलक दाखवत होते. सुवासिनी, कलंक शोभा, पुत्र व्हावा ऐसा, वैजयंता, मानिनी, प्रपंच असे मराठीत एकापेक्षा एक सरस चित्रपट येत असताना हिंदीत गंगा जमना हा संगीतमय रंगीत चित्रपट आला. त्याच दरम्यान जंगली चित्रपटात ‘याऽऽऽहू’ची आरोळी देत शम्मी कपूर आला. मनोहारी निसर्ग, ‘कश्मीर की कली’ शोभावी अशी सायरा बानू आणि ‘मेरे यार शब्बा खैर’... हिंदी सिनेमाचं, प्रेक्षकांचं a त्या वादळात हरवलं. मनोरंजन हा मंत्र प्रभावी ठरू लागला...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com