Premium|Keychain Collection : असावा एखादा छंद...

The Unique World of Keychain Collection : किल्लीसोबत लावली जाणारी साधी कीचेन एका पुणेकर अभियंत्यासाठी ३५ वर्षांच्या अनोख्या संग्रहाची ओळख बनली आहे. रेडिओ, पेन, लायटर, ग्लासपासून रेनकोटपर्यंत वस्तू त्यात सामावल्या आहेत.
Keychain Collection

Keychain Collection

esakal

Updated on

श्रेया माधवी

प्रसाद महाशब्दे यांनी जमवलेल्या अनेक कीचेन्समध्ये काहीतरी वेगळं वैशिष्ट्य आहे. एका कीचेनमध्ये रेडिओ आहे, तर एका कीचेनमध्ये आवाज रेकॉर्ड करता येतो! काही कीचेन्समध्ये पेन्स आहेत. काहींमध्ये लायटर आहे. काहींमध्ये तर चक्क ग्लास, नेलकटरही लपलेलं आहे. त्यांच्या संग्रही असलेल्या बॉलच्या एका कीचेनमध्ये तर थेट रेनकोटच आहे.

खिशातल्या छोट्याशा किल्लीला जोडलेली कीचेन ही अनेकांसाठी किल्ली हरवू नये म्हणून तिला सांभाळण्यासाठी लावलेली साधीशी वस्तू असते. पण काहींसाठी ती संग्रही ठेवण्याचीही वस्तू होऊ शकते. अशाच एका व्यक्तीनं कीचेन्स जमवण्याचा छंद जोपासला आहे. या सगळ्या कीचेन्स मला प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या. कीचेन्सचे इतके विविध प्रकार असू शकतात आणि ते आपण आपल्या संग्रही ठेवू शकतो, हे बघून मला आश्‍चर्यच वाटलं.

या कीचेन संग्राहकाचं नाव प्रसाद महाशब्दे. मूळचे पुणेकर असलेले महाशब्दे पेशानं इंजिनिअर. लहानपणापासूनच त्यांना कीचेन जमवण्याचा छंद जडला. याची सुरुवात कशी झाली याबद्दल महाशब्दे सांगतात, ‘‘साधारण चौथी-पाचवीत असताना आसपासची मुलं काडेपेट्या, नाणी, नोटा, स्टॅम्प्स जमा करायची. तेव्हा या वस्तू गोळा करणं तसं सामान्य होतं. पण मला या नेहमीच्या वस्तूंऐवजी वेगळं काहीतरी गोळा करण्याची इच्छा होती. मग अचानक कीचेन जमा करण्याची कल्पना डोक्यात आली. आणि लगेचच कामाला लागलो.’’ साधारण ३५ वर्षांपासून ते विविध प्रकारच्या कीचेन्स जमवत आहेत. त्यांची पहिलीवहिली कीचेन होती पोस्टकार्डची. त्यांना ही कीचेन एका हातगाडीवर मिळाली, तीही अवघ्या १५ पैशांना! तेव्हापासून कीचेन जमवण्याचा प्रवास सुरू झाला. ही १५ पैशांची कीचेन एका मोठ्या संग्रहाची सुरुवात असेल, असं तेव्हा त्यांना वाटलंही नव्हतं!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com