Premium|Khajuraho Group of Monuments UNESCO : खजुराहो: चंदेला राजवंशाची राजधानी आणि शिल्पकलेचा अनमोल ठेवा

Indian Temple Architecture and Wildlife Sanctuaries : चंदेला राजांच्या काळातील खजुराहोची जिवंत पाषाणशिल्पे आणि जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल असलेल्या सुंदरबनमधील वाघांचे उभयचर जीवन, भारतीय निसर्ग आणि कलेचा अद्भूत अविष्कार मांडणारा हा विशेष लेख पर्यटकांसाठी एक पर्वणीच ठरेल.
Indian Temple Architecture and Wildlife Sanctuaries

Indian Temple Architecture and Wildlife Sanctuaries

esakal

Updated on

वरूण परब

खजुराहो स्मारक समूह

  • जवळचे शहर : छत्तरपूर

  • जवळचे विमानतळ : खजुराहो विमानतळ

  • जवळचे रेल्वेस्थानक : खजुराहो

  • केव्हा जाल? : ऑक्टोबर ते मार्च

वारसास्थळाची वैशिष्ट्ये : मध्य प्रदेशमधील छत्तरपूर शहरापासून २९ किलोमीटरवर केन नदीच्या तीरावर निनोराताल सरोवराच्या काठी वसलेले ऐतिहासिक ठिकाण. त्याकाळी या प्रदेशात खजुराची भरपूर झाडे असल्यामुळे त्यास खजुराहो हे नाव प्राप्त झाले असावे, असे म्हणतात. बुंदेलखंड प्रदेशात

इ.स. नवव्या ते तेराव्या शतकापर्यंत राज्य करणाऱ्या चंद्रवंशीय राजपूत चंदेला राजवंशाची खजुराहो ही राजधानी होती. या काळात त्यांनी इथे नागर वास्तुशिल्पशैलीत अनेक मंदिर बांधली. ऐतिहासिक दस्तावेजानुसार इथे सुमारे ८५ मंदिरे होती, असे उल्लेख सापडतात. यातील सध्या फक्त २३ मंदिरांचे अवशेष सुस्थितीत आहेत. ही मंदिरे पश्चिम, पूर्व व दक्षिण अशा तीन दिशांना विखुरलेली आहेत. पश्चिम समूहात चौसष्ट योगिनी, लालगुआन, कंदरिया महादेव, देवी जगदंबी, महादेव, चित्रगुप्त, विश्‍वनाथ, पार्वती, लक्ष्मण, वराह, मातंगेश्‍वर, हनुमान या मंदिरांचा समावेश होतो; तर पूर्व समूहात ब्रह्मा, वामन, जवेरी, पार्श्‍वनाथ, आदिनाथ, शांतिनाथ या मंदिरांचा समावेश होतो. दक्षिण समूहात दुलादेव व चतुर्भुज ह्या दोन मंदिरांचा समावेश होतो. खजुराहो मंदिरांची शिखररचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती शंक्वाकार असून वर निमुळती होत गेलेली आढळते. शिखराच्या अगदी वरच्या टोकास कुंभ बसविलेला आहे. असे क्रमाने वर चढत जाणारे शिखर म्हणजेच देवनिवास असलेले पौराणिक कैलास किंवा मेरू पर्वतांचे प्रतिरूप. याचमुळे गिरिमंदिर ही स्थापत्यशैली इथे भरभराटीस आलेली दिसते. खजुराहो अगदी जिवंत वाटणाऱ्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. शिल्पकारांनी येथील शिल्पांत दैनंदिन मानवी जीवनातील सामान्य विषयही शिल्पांकित केले आहेत. खजुराहोच्या शिल्पांतून त्या काळातील अलंकार, वाद्ये, पोशाख, प्रसाधने, मनोरंजनाची साधने, केशभूषा वगैरेंचे दर्शन होते. अशा हजारो शिल्पकृतींनी सजलेले हे शहर मानवी भावनांचे उठावदार प्रदर्शन घडवते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com