फूडपॉइंट : सुप्रिया खासनीस
वाढप
४ व्यक्तींसाठी
साहित्य
पाऊण लिटर दूध, पाऊण वाटी कुस्करलेल्या शेवया, अर्धी वाटी साखर, वेलची पूड, २ ते ३ चमचे तूप, सुकामेव्याचे बारीक केलेले तुकडे आवडीप्रमाणे.
कृती
सर्वप्रथम तुपावर शेवया तांबूस होईपर्यंत परतून घ्याव्यात. शेवया भाजलेल्या असतील तर त्या पुन्हा परतण्याची आवश्यकता नाही. नंतर शेवया भिजतील इतपत पाण्यात शेवया शिजवून घ्याव्यात व चाळणीवर ओतून त्यातील पाणी काढून टाकावे. पाणी काढून टाकल्यामुळे शेवया छान मोकळ्या राहतात. नंतर शेवयांत साखर घालून त्या पुन्हा शिजवाव्यात. मिश्रण थंड झाल्यावर त्यात दूध, वेलची पूड व आवडीप्रमाणे सुकामेव्याचे बारीक केलेले तुकडे घालून एक उकळी आणावी.