

Glacier
esakal
हिमनदी वितळते तेव्हा तिच्यातून छोटे ओढे तयार होतात. हे ओढे एकत्र येतात, प्रवाह वाढतो आणि नदी जन्माला येते. त्यामुळे हिमनदी आणि नदी यांचं नातं केवळ भौगोलिक नाही, तर अस्तित्वाचं आहे. हिमनदी म्हणजे नदीचं गर्भगृह. नदीचं पहिलं रूप, पहिला श्वास.