

Kids Fashion
esakal
मैत्रेयी पंडित-दांडेकर
या पिढीनं किड्स फॅशन डिझायनर्सना प्रचंड प्रमाणात रोजगार आणि सोबत जॉब सिक्युरिटीही उपलब्ध करून दिली आहे. पण माझ्यासारख्या आयांना त्याच रोजगारातून तयार झालेल्या बारीक बारीक अंगठ्या, प्लॅस्टिक मणी/खडे असलेली तकलादू ब्रेसलेट्स, चमकी हाताला चिकटणाऱ्या हजारो पिना आणि कपाटातून वाहणारे कपडे हे सगळं आवरता आवरता रोज नाकी नऊ येतात. तरीदेखील ॲन्युअल डेला पाहिजे त्या रंगाचा हेअर बो सापडत नाहीच आणि सापडलाच तर तो आऊट ऑफ फॅशन झालेला असतो...