
राजेश कळंबटे
संगमेश्वर तालुक्यातल्या कोडअसुर्डे येथील कीर्ती अमोल कापडी हिने तमिळनाडूतील कोइम्बतूर कृषी विद्यापीठाच्या फॉरेस्ट कॉलेज अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटमधून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर इंडस्ट्री फाउंडेशनमार्फत शाश्वत शेतीमधून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बांबू शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले. महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवरील काही दुर्गम भागांत प्रायोगिक तत्त्वावर आदिवासी महिलांसाठी तिने काम केले. त्यानंतर कीर्तीने महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांसाठी बांबू लागवडीतून रोजगारनिर्मितीसाठी काम केले. सध्या तिच्याकडे ईशान्य भारतातल्या दोन राज्यांची जबाबदारी आहे. सध्या या दोन राज्यात कीर्ती आणि तिचे तीन सहकारी सक्षमीकरणाची चळवळ पुढे नेत आहेत...!