Premium|Konark Sun Temple History : कोणार्क मंदिराच्या भव्यतेमागे हजारो हातांचे अनामिक श्रमविश्व

Konark Temple Workers : कोणार्क मंदिराच्या निर्मितीमागे राजे आणि प्रमुख शिल्पकारांबरोबरच दगड वाहणारे, मचाणे बांधणारे, नावाडी, स्वयंपाकी आणि असंख्य कामगारांचे योगदान होते. या अदृश्य श्रमविश्वातून मंदिराच्या इतिहासाचा नवा पैलू समोर येतो.
Konark Sun Temple History

Konark Sun Temple History

esakal

Updated on: 

शंतनू परांजपे

कोणार्कचे कामगारविश्व पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते - येथे केवळ अनामिक श्रम नाहीत. अर्थात हजारो हातांपैकी अनेक कायम अनामच राहतात, पण बया चकादा इतके तरी करतो, की तो मंदिराच्या इतिहासाला केवळ राजाच्या नावात अडकू देत नाही. तो आपल्याला आठवण करून देतो, की भव्य स्मारके नेहमी अनेक लहान कामांच्या बेरजेनेच तयार होतात.

या  लेखमालेच्या मागील लेखात (ता. १९ सप्टेंबर, मंदिर उभारणारी अदृश्‍य यंत्रणा) आपण कोणार्क मंदिराच्या मागे उभी राहिलेली पदरचना पाहिली. राजापासून सूत्रधारापर्यंत, राजगुरूपासून महापात्रांपर्यंत, करणांपासून कोठार अधिकाऱ्यांपर्यंत अनेक पदे या कामात गुंतलेली होती. परंतु कोणतीही पदरचना कागदावर जितकी प्रभावी दिसते, तितकीच ती प्रत्यक्षात लोकांच्या श्रमांवर टिकलेली असते. कोणार्कसारखे मंदिर एका राजाच्या इच्छेने सुरू झाले, सूत्रधाराच्या आराखड्याने दिशा घेतली, पण ते उभे राहिले ते हजारो हातांच्या मदतीने. या हातांचे जग समजून घेतले नाही, तर कोणार्कच्या निर्मितीचा इतिहास अर्धवट राहतो.

मोठ्या मंदिरांच्या संदर्भात ते ‘शिल्पकारांनी बांधले’ असे एक वाक्य आपण सहज म्हणतो. पण त्या एका शब्दात किती विविध लोक सामावलेले असतात, याचा विचार क्वचितच केला जातो. दगड कापणारे, दगड ओढून आणणारे, मचाणे बांधणारे, रचना तपासणारे, छिन्नीने सूक्ष्म काम करणारे, धातुकाम करणारे, नावाडी, स्वयंपाकी, छावणी सांभाळणारे, विधी करणारे, लेखणी चालवणारे... एका मंदिराच्या बांधकामात दगडांइतक्याच प्रकारचे मनुष्यही असतात. बया चकादा या बाबतीत आपल्याला फार दुर्मीळ दृष्टी देतो, कारण तो केवळ मुख्य शिल्पकारांची नावे देत नाही; तो संपूर्ण कामगारविश्वाची रचना दाखवतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com