Premium|Kudal Stone Inscription : कुडलच्या शिलालेखामुळे इतिहास संशोधनाला नवे पुरावे आणि नवी दिशा

Sangameshwar Temple Solapur : सोलापूरच्या कुडल येथील संगमेश्वर मंदिरातील शिलालेख नव्या संशोधनासाठी महत्त्वाचा ठरत आहे. ऐतिहासिक पुराव्यांचे पुनर्वाचन झाल्यास पूर्वीचे अनेक निष्कर्ष आणि ‘आद्य’ मान्यता बदलू शकतात.
Kudal Stone Inscription

Kudal Stone Inscription

esakal

Updated on

डॉ. नागनाथ बळते

शिलालेख संशोधनाच्या क्षेत्रात नित्यनवीन पुरावे प्रकाशात येत असतात. संशोधक सातत्यपूर्ण परिश्रम, सूक्ष्म निरीक्षण आणि चिकित्सक अभ्यास यांच्या आधारे नवीन साधनसामग्री उपलब्ध करून देतात. परिणामी, एखाद्या शिलालेखाला किंवा ऐतिहासिक पुराव्याला पूर्वी बहाल झालेला ‘प्रथम’ किंवा ‘आद्य’ असा दर्जा नव्या संशोधनाच्या आधारे बदलू शकतो.

शीर्षकातील उक्ती कुडलच्या शिलालेखात कोरलेली आहे. हा शिलालेख सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुडल येथे भीमा व सीना नद्यांच्या संगमावर वसलेल्या संगमेश्‍वर मंदिराच्या सभामंडपातील एका तुळईवर कोरलेला आहे. कुडल येथील संगमस्थळी उभारलेले संगमेश्‍वर मंदिर ऐतिहासिक व पुरातत्त्वीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे.

याच मंदिराच्या मंडपाबाहेर आणखी एक शिलालेख असून तो कन्नड लिपी व भाषेतील आहे. हा शिलालेख काही अंशी संस्कृतमधील असण्याचीही शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार, या शिलालेखाचे अद्याप शास्त्रीय वाचन व संपादन झालेले नाही. या शिलालेखाचा आकार साधारणतः सहा फूट लांब व साडेतीन फूट रुंद असून, सध्या तो दोन तुकड्यांत विभागलेला आहे. या महत्त्वपूर्ण शिलालेखांकडे आजवर अपेक्षित तेवढे संवर्धनात्मक व संशोधनात्मक लक्ष दिले गेलेले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com