Premium|Kumaon Travel : कुमाऊँचा दहा दिवसांचा प्रवास; हिमालय, मंदिरे आणि निसर्गाचा अविस्मरणीय अनुभव

Kukuchina Dunagiri Cave : कुमाऊँच्या दहा दिवसांच्या प्रवासात साहसी ट्रेकिंग, हिमालयीन शिखरे, मंदिरे आणि शांत निसर्गाचा अनुभव घेताना विमानप्रवासातील अडचणींवर मात करून कुकुचिना-दुनागिरीपर्यंतचा प्रवास संस्मरणीय ठरला.
Kukuchina Dunagiri Cave

Kukuchina Dunagiri Cave

esakal

Updated on

मंदार व्यास

बागेश्‍वर-अल्मोडा-द्वाराहाट-कुकुचिना हा प्रवास उत्तराखंडच्या कुमाऊँ पर्वतरांगांमधील एक अत्यंत सुंदर, शांत आणि निसर्गरम्य प्रवास आहे. कुकुचिना हे अल्मोडा जिल्ह्यातील द्वाराहाटजवळ वसलेले छोटेसे ऑफबीट गाव आहे. हे ठिकाण दुनागिरी गुहेसाठी प्रसिद्ध आहे. कुकुचिनामधून दुनागिरी गुहेकडे जाणाऱ्या जंगलातल्या शांत वाटेवर वन्य फुले फुललेली होती.

प्रवास फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नसतो, तर तो स्वतःचा शोध घेण्यासाठी असतो. आमचा दहा दिवसांचा कुमाऊँ प्रवासही यासाठीच होता. साहसी ट्रेकिंग, कडाक्याची थंडी, पवित्र मंदिरे, हिमालयातील विलोभनीय शिखरे आणि शांतता या सगळ्यांचा अनोखा संगम असलेला हा प्रवास आम्ही केवळ पायांनी नव्हे, तर मनानेही केला.

प्रवासाची सुरुवात आव्हानात्मक ठरली. आम्ही कुमाऊँ सहलीसाठी पुण्याहून रात्री एक वाजताच्या फ्लाइटने दिल्लीला जाणार होतो. पण विमान कंपनीच्या चुकीमुळे फ्लाइटला उशीर झाला आणि आम्ही पहाटे पाच वाजता निघालो. या गोंधळात आमची पंतनगरची कनेक्टिंग फ्लाइट चुकली. त्यामुळे दिल्लीला पोहोचल्यानंतर आम्ही गाडीने पंतनगरला गेलो. दिल्ली ते पंतनगर हा सुमारे २८० किलोमीटरचा प्रवास करून आम्हा सगळ्यांना थकवा आला होता, पण उत्साह कमी झाला नव्हता. उशीर झाला तरी पोहोचलो या भावनेने एक वेगळाच आनंद झाला.

पंतनगरला आमची पुढची गाडी तयार होती. पहिला थांबा होता कैंची धामला. या ठिकाणी नीम करोली बाबांचा आश्रम आहे. येथे आम्ही दुपारी चारच्या दरम्यान पोहोचलो. त्या वेळी तिथे अजिबात गर्दी नव्हती, त्यामुळे शांतता अनुभवता आली. आश्रमात आरामात फिरता आले. कोसी नदीचा खळखळाट ऐकू येत होता. त्यानंतर आम्ही कौसानीकडे प्रयाण केले. सोमेश्‍वर खोऱ्यातून जाणाऱ्या घाट रस्त्यावरून प्रवास करून संध्याकाळी सात वाजता आम्ही कौसानीत पोहोचलो. एव्हाना सूर्यास्त झाला होता. हॉटेलच्या खिडकीतून दिसणारे हिमालयाचे विलक्षण दृश्य बघून प्रवासाचा थकवा निघून गेला. सायंकाळ सुवर्णरंगांनी उजळून निघाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com