

Lace Fashion Trends 2026
esakal
लेस हे फॅशन जगातील सदाबहार कापड मानले जाते. आज पॅरिस, मिलान, लंडन, न्यूयॉर्क यांसारख्या फॅशन कॅपिटल्समध्ये लेसचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. इंटरनॅशनल रनवेवर लेस गाऊन्स, ड्रेसेस, टॉप्स आणि अगदी पँट्सही पाहायला मिळतात. भारतीय फॅशनमध्येही लेसने साडी, कुर्ती, लेहेंगा आणि ड्रेस या प्रकारांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
फॅशनच्या जगात काही फॅब्रिक्स अशी असतात, जी काळाच्या ओघात बदलतात, पण कधीच जुनी वाटत नाहीत. लेस (Lace) हे त्यापैकीच एक अत्यंत नाजूक, मोहक आणि सदाबहार कापड. पारंपरिक पोशाखांपासून ते आधुनिक वेस्टर्न वेअरपर्यंत, सगळ्या प्रकारांत लेसने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. स्त्रीसौंदर्य अधिक खुलवणारे हे कापड आजही जागतिक फॅशनमध्ये तितकेच महत्त्वाचे आहे.