डॉ. मानसी शैलेश पवार, डॉ. शैलेश दत्तात्रय पवार
छोट्या बोटीतून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. जाताना समुद्रही खवळलेला होता व त्याचे रौद्र रूप पाहून आम्हा पर्यटकांच्या काळजाचा ठोकाच चुकत होता. सर्वांचे डोळे १०-१५ किलोमीटर दूर असलेल्या क्रूझकडे लागले होते. खवळलेल्या समुद्रामुळे आमची छोटी बोट प्रचंड हेलकावे खात होती. त्यामुळे क्रूझ अजूनच दूर असल्याचे भासत होते. प्रचंड लाटांमुळे क्रूझच्या जवळ जाऊनही क्रूझवर चढणे अवघड होऊन बसले होते...