

Winter Wear for Men and Women
थंडीत योग्य गरम कपड्यांची निवड महत्त्वाची ठरते. खूप थंडीमध्ये जाड जॅकेट्स, हातमोजे, सॉक्स आणि टोप्या घालणे आवश्यक आहे. तुमचा लुक कितीही स्टायलिश असला, तरी ऊब आणि सुरक्षितता गरजेची आहे. योग्य रंग, योग्य लेयरिंग आणि योग्य फॅब्रिक निवडल्यास तुमचा हिवाळी लुक नक्कीच ‘कूल’ दिसेल.
हिवाळ्याची चाहूल लागली की सर्वात आधी आठवतात ते म्हणजे गरम कपडे, स्वेटर्स, जॅकेट्स आणि आरामदायी शूज! तापमानाचा पारा खाली येऊ लागला, की फॅशन आणि ऊब यांचा योग्य तो समतोल साधणे गरजेचे असते. आजकाल पुरुष आणि स्त्रिया दोघेही हिवाळी पेहरावात स्टाइल आणि कम्फर्ट या दोन्ही गोष्टींकडे सारखेच लक्ष देतात. योग्य कपड्यांची निवड, त्यांचे प्रकार, ट्रेंड्स आणि त्यांची देखभाल हेही तितकेच महत्त्वाचे असते. हिवाळ्यात ऊब टिकवून ठेवायला वॉर्डरोबमध्ये कुठले कपडे महत्त्वाचे असतात ते बघूयात.