
प्रसाद नामजोशी
लेया खऱ्या अर्थानं जगप्रसिद्ध झाली ती ब्लू इज द वॉर्मेस्ट कलर या २०१३च्या चित्रपटामुळे. हा चित्रपट जगभर नावाजला गेला, त्यात एमाची भूमिका करणारी लेया आणि तिची सहनायिका अदेल या दोघींचं अपार कौतुक झालं. एवढं, की कान चित्रपट महोत्सवात केवळ दिग्दर्शकाला देण्यात येणारा पाम दि’ओर हा पुरस्कार दिग्दर्शकाबरोबर या दोन्ही नायिकांनाही देण्यात आला!