Premium|Leena Sohoni Marathi Translations : माझा अनुवाद प्रवास

Art of Literary Translation in Marathi : गेली ३९ वर्षे इंग्रजी साहित्याला मराठी साचा देणाऱ्या लीना सोहोनी यांचा अनुवाद प्रवास थक्क करणारा आहे. 'लज्जा' ते 'लता मंगेशकर' यांच्या चरित्रापर्यंत त्यांनी शब्दांच्या माध्यमातून जागतिक साहित्य मराठी वाचकांच्या घराघरांत पोहोचवले आहे.
Leena Sohoni Marathi Translations

Leena Sohoni Marathi Translations

esakal

Updated on

लीना सोहोनी

मराठी वाचकांना लीना सोहोनी हे नाव परिचित आहे. अनेक उत्तमोत्तम इंग्रजी पुस्तकांचे तितकेच उत्तमोत्तम अनुवाद लीना सोहोनी गेली अनेक वर्षं वाचकांपर्यंत पोहोचवत आहेत. जागतिक पुस्तक दिनानिमित्त त्यांच्या अनुवाद प्रवासाविषयी त्यांच्याच शब्दांत...

मी  गेली ३८-३९ वर्षं सातत्यानं अनुवादाचं काम करत आहे. पण आज या लेखातून तुम्हा वाचकांशी संवाद साधण्याची संधी मिळत असल्याने, एक अनुवादक म्हणून माझ्या अनुभवांचा, काही कडू आणि बहुतेक गोड आठवणींचा पट तुमच्यासमोर उलगडून दाखवते.

मी तेव्हा बहुधा इयत्ता सहावी किंवा सातवीत असेन. एक दिवस मला माझ्या वडिलांची एक जुनी वही सापडली. त्यात त्यांनी एक संपूर्ण कादंबरी सुंदर अक्षरात लिहून काढली होती. मराठी कादंबरी असूनही पात्रांची नावं परकीय होती आणि वर्णन केलेली ठिकाणंही अनोळखी होती. हे कोडं मला उलगडत नव्हतं. इतक्यात वडील आले आणि त्यांनीच सांगितलं, की तो त्यांनी केलेला एका गाजलेल्या फ्रेंच कादंबरीचा अनुवाद होता. अनुवाद म्हणजे काय, हे त्यांनी मला अगदी सोप्या शब्दांत समजावून सांगितलं. त्या अबोध वयातच अनुवादित साहित्यही तितकंच प्रभावी असू शकतं, ही गोष्ट माझ्या मनावर ठसली असावी. शाळेत असताना एखादं चांगलं पुस्तक वाचल्यावर त्यावर छोटासा परिच्छेद लिहायची सवय आमच्या वर्गशिक्षकांनी आम्हाला लावली होती. आता वाटतं, या सर्वांचा परिणाम म्हणून या विषयाची बीजं नकळत मनात रुजली असतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com