Premium|Letters from a Turkish Cat : मांजराच्या नजरेतून माणूसपण आणि अस्थिर जगाचा वेध घेणारी कादंबरी

Oya Baydar Novel : ‘तुर्की मांजराकडून आलेली पत्रे’ ही कादंबरी मांजराच्या कुतूहलातून माणूसपण, राजकारण आणि बदलत्या जगाचे मानसशास्त्र उलगडते. नीना या मांजरीच्या संवेदनशील भावविश्वातून अनोख्या कथानकाची सुरुवात होते.
Oya Baydar Novel

Oya Baydar Novel

esakal

Updated on: 

तेजसी आगाशे

मांजराची सहज कुतूहलप्रवृत्ती हा तुर्की मांजराकडून आलेली पत्रे या कादंबरीचा कणा आहे, कारण तिच्यामुळेच मांजरांच्या मालकांचे एकेक प्रश्न उलगडत जाताना दिसतात. ‘मांजर असणं’ व ‘माणूस असणं’ या अवस्थांची व्यवच्छेदक लक्षणं व त्यातील फरकांचं गुंतागुंतीचं चित्रण पुस्तकात आहे. जगाच्या अस्थिर काळाचं मानवाच्या आणि मांजराच्या दृष्टिकोनातून राजकीय-मानसशास्त्रीय विश्लेषणही आहे.

‘तिने’ आपलं शरीर ताणता येईल, तेवढं ताणलं, एक गोडशी जांभई दिली आणि शरीराला सुखावणाऱ्या त्या उबदार उन्हाचा आनंद घेत तिनं शरीराचं मुटकुळं करून घेतलं. घराच्या आतल्या भागातून, फ्राइंग पॅनवर चुरचुरत तळल्या जाणाऱ्या माशांचा, लोण्याचा, पार्स्ली आणि लसूण यांच्या मिश्रणाचा तोंडाला पाणी सुटेल, असा वास तिनं एक मोठ्ठा श्‍वास घेऊन छातीत भरून घेतला...

बरोबर, या वर्णनावरून ही ‘ती’ म्हणजे एक सुंदरशी मनीमाऊ आहे, हे मांजरप्रेमी वाचकांनी नक्कीच ओळखलं असेल. ‘नीना’ नावाच्या, एक विशेष व्यक्तिमत्त्व लाभलेल्या देखण्या भाटीच्या भावविश्‍वापासून सुरू होते, तुर्की मांजराकडून आलेली पत्रे या आगळ्यावेगळ्या कादंबरीची सुरुवात. सकाळचं कोवळं उबदार ऊन, व्हरांड्यात छान ताणून देऊन ऊन खात पहुडलेली माऊ, स्वयंपाकघरातून येणारे विविध रुचकर वास आणि मांजराच्या तीक्ष्ण संवेदना आणि टवकारलेले कान या वातावरणनिर्मितीतून लेखक ओया बाय्दोर आपलं बोट धरून आपल्याला अलगद त्या मार्जारविश्‍वात घेऊन जातात. पहिल्याच परिच्छेदातून वाचकाची उत्सुकता चाळवली जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com