Premium|Life After Loss : एक पंख छाटल्यावर...

Coping With Loneliness : जोडीदाराच्या निधनानंतर आयुष्याचा उत्तररंग स्वीकारताना मानसिक तयारी, नव्या नात्यांची उभारणी, छंद जोपासणे आणि सकारात्मक दृष्टिकोनातून एकटेपणाला सामोरे जाण्याचा प्रेरणादायी विचार या लेखातून मांडला आहे.
Life After Loss

Life After Loss

esakal

Updated on

विद्या हर्डीकर-सप्रे

व्यक्तिगत पातळीवर एकदा वास्तव स्वीकारलं, की सांधेबदलाला, खडखडाटाला सामोरं जाण्यासाठी स्वतःला बदलण्याची आणि नव्या परिस्थितीशी तडजोड करण्याची तयारी होते. या बदलामुळे खिन्न होऊन न जाता ही नव्या आयुष्याची सुरुवात आहे, अशा सकारात्मक दृष्टिकोनातून स्वतःकडे पाहावं. नवीन मित्रमंडळी जोडण्याची संधी, स्वतःचे मागे पडलेले छंद जोपासण्याची संधी, स्वतःचं नवीन जग निर्माण करण्याची संधीच असते की ही!

आयुष्याचा पूर्वरंग संपतो आणि उत्तररंग सुरू होतो, त्याची सीमारेषा धूसर असते. आयुष्याची गाडी रूळ बदलत असताना थोडा खडखडाट झाला, तर गडबडून न जाता आपल्याला हा प्रवास सुखाचा आणि आनंदाचा करण्यासाठी उत्तररंगाच्या आयुष्याची काळानुसार कोणती रंगचित्रे दिसतात, ते आपण मागील लेखात (उत्तररंगातील नात्यांचे बदलते रंग!, ता. १८) पाहिले. नवरा-बायकोच्या एकत्र आयुष्याच्या काळाकडे थोडी नजर टाकली. ‘जेथे जातो तेथे तू माझा किंवा माझी सांगाती’ ही केवळ उत्तररंगातील नाही, तर आयुष्यभराची संगत. अशी संगत संपण्याच्या दुर्दैवी दिवसाला दोघांपैकी कोणालातरी सामोरे जावे लागते आणि एकांड्या आयुष्याचा प्रवास सुरू होतो - याला म्हणता येईल, एक पंख छाटल्यावरचा काळ!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com