अंतराळ प्रवासात आणि प्रवासातल्या एखाद्या आणीबाणीच्या क्षणी स्वतःच्या शरीराची आणि मनाचीही काळजी कशी घ्यायची हा अंतराळवीरांच्या प्रशिक्षणाचा भाग असला, तरी अंतराळातील विचित्र, कमी गुरुत्वाकर्षणाच्या आणि एका अनिश्चिततेत गुरफटलेल्या वातावरणात दीर्घकाळ राहिल्यामुळं शरीरावर आणि मनावरही परिणाम होण्याची शक्यता असते, असे तज्ज्ञ सांगतात. पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना ४५ दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली राहावे लागते.