शास्त्र प्रसादाचे : मौल्यवान मोदक

आराध्य गणरायाचे आगमन म्हणजे मोदक आलाच. घराघरात मोदकाचा नैवेद्य गणपतीला दाखवला जातो.
lord ganesha favourite modak prasad ukadiche modak health benefits
lord ganesha favourite modak prasad ukadiche modak health benefits Esakal

- राधिका शहा, आहारतज्ज्ञ

आराध्य गणरायाचे आगमन म्हणजे मोदक आलाच. घराघरात मोदकाचा नैवेद्य गणपतीला दाखवला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे मोदक असतात. परंतु, त्यात सगळ्यात आवडता म्हणजे उकडीचा मोदक. उकडीच्या मोदक करताना बहुतांश वेळा तांदूळ वापरला जातो. तांदळाच्या पिठीचा गरम-गरम मोदक हा गणपतीचा आवडता नैवेद्य.

प्रतिकारशक्ती वाढविणारा पदार्थ

  •  तांदळाच्या पिठात कार्बोहायड्रेट्स असतातच, त्याचबरोबर काही जीवनसत्त्वेही असल्याने शरीराचे पोषण होते.

  •  नारळ, गूळ, सुंठ, विलायची यातून तयार झालेले सारण घातले जाते. साजूक तूप घालून हा मोदक खाल्ला जातो. या प्रत्येक घटकाचे वेगवेगळे पोषणमूल्य आहे.

  •  नारळात फायबरचे प्रमाण सर्वाधिक असते.

  • गूळ हा साखरेचाच असतो. परंतु, साखरेत नसणारे लोह गुळात असते. ते शरीराच्या पोषणासाठी चांगले असते.

  • सुंठही ‘अँटी ऑक्सिडंट’ असते.

  •  विलायची आणि गुळामुळे आपली पचनक्रिया चांगली राहते.

lord ganesha favourite modak prasad ukadiche modak health benefits
Ganesh Chaturthi 2023 Recipes मोदकाच्या आमटीची रेसिपी, पाहा VIDEO

गणेशोत्सव हा पावसाळ्यात येतो. या वातावरणात सर्दी, खोकला सहजतेने होतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक असते. गूळ, नारळ, वेलची, सुंठ याचे तुपासोबत एकत्र सेवन केल्याने त्यातून पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती मिळते.

हे मोदक तळलेले नसतात. ते उकडलेले असतात. त्यातून तळलेल्या पदार्थातून वाढलेले फॅटस् टाळता येतात. कधी-कधी ते गव्हाच्या पिठाचेही असतात. तेदेखील गोड असले तरीही आरोग्याच्या दृष्टीने पोषक असतात. गूळ किंवा साखर मधुमेही रुग्णांना चालत नाही.

त्याऐवजी सुकामेवा, खजूर वापरून मोदक केल्यास तो मधुमेही रुग्णांना खाता येतो. तळलेल्या मोदकापेक्षा उकडीचा मोदक अधिक योग्य असतो. अर्थात, हा मोदक पोषणमूल्य देतो म्हणून कितीही खाणे योग्य नाही. तर, तो प्रमाणात सेवन केला पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com