

Appetite Loss Treatment
esakal
विद्या हर्डीकर-सप्रे
वजन कमी होणार नाही, याची काळजी घ्यावी. सत्तरी उलटल्यानंतर शक्यतो वजन कमी करण्याच्या भानगडीत पडू नये. ‘आहे हे असं आहे’ असं समजून आपल्या स्थूलपणाचा स्वीकार करावा. कारण वजन कमी होणं म्हणजे फॅट कमी होतं असं नाही, तर मुळात स्नायू कमकुवत झालेले असतात.
‘तोंडाची भूक आणि पोटाची भूक यातला फरक समजला पाहिजे’ असं मी एका व्याख्यानात ऐकलं होतं. पुष्कळ व्यापक तत्त्वज्ञानिक अर्थाने व्याख्याते सांगत होते. पण अगदी शब्दार्थाने ‘समोर दिसलं म्हणून तोंडात टाकलं’ आणि ‘खरोखरच पोटात भुकेची गुरगुर सुरू झाली म्हणून सेवन केलं’ यातील फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे. याचा विचार आपण या लेखाच्या आधीच्या भागात (ता. १५ ऑगस्ट) केला होता. त्याशिवाय भूक मंद का होते, याची विविध कारणंदेखील पाहिली होती. कारणं कोणतीही असली, तरी कमी खाण्याचे परिणाम काय होतात आणि भूक वाढवण्यासाठी काही करता येतं का? याचा विचार आपण या भागात करू या.