Premium|Indian Female Artists in Mithila Painting : शेणानं लिंपलेल्या भिंती ते आधुनिक कॅनव्हास; स्त्रियांच्या कल्पकतेने सजलेली मिथिलेची 'मधुबनी' कला

Madhubani Painting History Bihar : मिथिलेच्या मातीतील सांस्कृतिक गंध जपणारी आणि रामायण काळापासून चालत आलेली मधुबनी चित्रकला आज जागतिक स्तरावर बिहारची ओळख बनली असून, स्त्रियांच्या कल्पकतेतून साकारलेला हा वारसा आता आधुनिक कॅनव्हासवरही तितकाच दिमाखात मिरवत आहे.
Indian Female Artists in Mithila Painting

Indian Female Artists in Mithila Painting

esakal

Updated on

मधुबनी हस्तकला फक्त प्रतिमा चित्रांकित करण्यापुरती मर्यादित नाही. ती मिथिलेतल्या लोकभावना आणि त्या मातीत मुरलेला सांस्कृतिक गंध यांची चिमूटही चित्रात पेरत जाते. एकूणच बिहारमधल्या लोकांच्या जगण्यावर मधुबनी कलेचा अतिशय गडद आणि बहुपदरी प्रभाव आहे.

बौद्ध आणि जैन धर्मांची जन्मभूमी असणारं आणि नालंदाच्या प्राचीन विद्यापीठामुळे जगभर नावाजलेलं बिहार ही कलाभूमीही आहे. मधुबनी पेंटिंग, खाटवा ॲप्लीक, सुजनी भरतकाम, टिकुली पेंटिंग, भागलपूरचं टसर सिल्क, सालेमपूरच्या कागदी वस्तू, गयेमधल्या पत्थरकट्टीची पाषाणकला अशा कितीतरी हस्तकला इथल्या मातीत कित्येक शतकांपासून रुजलेल्या आहेत. यातली सर्वाधिक लोकप्रिय आणि जगभरात पोहोचलेली कला म्हणजे मधुबनी चित्रकला.

बिहारमधला मधुबनी जिल्हा आज या कलेचं मुख्य केंद्र आहे. या वैशिष्ट्यपूर्ण चित्रकलेचा उगम मिथिला या ऐतिहासिक प्रांतातला असल्याचं मानलं जात असल्यामुळे मधुबनी आर्ट ‘मिथिला आर्ट’ म्हणूनही ओळखले जाते. मिथिला ही रामायणातली जनकाची नगरी, सीतेचं जन्मस्थान. राम आणि सीतेचा विवाह झाला, त्यावेळी जनकानं आपल्या प्रजाजनांना घरांच्या भिंती विवाह सोहळ्याच्या विविध प्रसंगाच्या चित्रांनी सजवाव्यात असं सुचवलं होतं आणि तेव्हा ही कला प्रथम अस्तित्वात आली, असा मिथिलेत पिढ्यान्‌पिढ्यांचा विश्वास आहे. याचा अर्थ, ही चित्रकला प्रथम भित्तिचित्रांच्या रूपात प्रकटली. नेमका कालावधी ठाऊक नसला, तरी कित्येक शतकांपूर्वी शेणानं लिंपलेल्या भिंतींवर आणि जमिनींवर इथल्या स्त्रियांनी या कलेचा आविष्कार घडवला असं निश्चितपणे सांगितलं जातं. ही चित्रकला मग पुढच्या पिढ्यांकडे संक्रमित होत राहिली. आता ही चित्रं कॅनव्हासवर, कापडावर, कागदावर, लाकडी वस्तूंवर आणि साड्यांवरही काढली जाताहेत. आज बिहारमधले अनेक स्त्री आणि पुरुष चित्रकार मधुबनी शैलीमध्ये पारंगत असले, तरी ऐतिहासिकदृष्ट्या स्त्रियांनी विकसित केलेली आणि त्यांचाच ठसा मिरवणारी कला म्हणून ती ओळखली जाते. मुळात मधुबनी चित्रं मुख्यतः उच्चवर्णीय स्त्रिया काढायच्या. मात्र, हळूहळू सगळ्याच वर्गातल्या स्त्रिया या कलेत पारंगत झाल्या. अर्थात त्यांची शैली आणि चित्रांचा आशय यांत भिन्नता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com