किशोर पेटकर
वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी, २००९मध्ये, व्यावसायिक टेनिसमध्ये पदार्पण केलेल्या मॅडिसन कीजने १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर तिच्या पहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाची स्वप्नपूर्ती केली.
मेलबर्न पार्क येथे झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात बेलारुसच्या अरिना सबालेन्कावर मात करत मॅडिसनने विजय साजरा केला. ताकदवान सर्व्ह आणि आक्रमक फोरहँड फटक्यांच्या जोरावर तीन सेट्समध्ये मिळवलेल्या या विजयाने तिने सबालेन्काच्या संभाव्य हॅटट्रिकची संधीही हिरावून घेतली.