
डॉ. आशुतोष जावडेकर
‘विलायती वाचताना‘ हे सदर न चुकता वाचणारा एक युवक मला नुकताच माझ्या डोंबिवलीमध्ये झालेल्या कार्यक्रमानंतर भेटला आणि म्हणाला, " दादा, तू भारी सांगतोस पण आम्ही शेवटी काय इंग्रजी वाचतो? तर फक्त न्यूजपेपर, आणि तोही फार तर फार दहा मिनिटं." मला एकदम जाणवलं की इंग्रजी वाचण्याचा सर्वोत्तम सराव वर्तमानपत्र आणि मासिकांमधून होतो, हे मला त्याच्यासारख्या महाराष्ट्रातील अनेक युवकांना सांगायला हवं. वर्तमानपत्रातील भाषा मुळात अस्सल, जिवंत असते.