
सुनील लिमये
अभयारण्य म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर फक्त घनदाट जंगलं, प्राणी, पक्षी, गवताळ प्रदेश एवढंच येतं. पण प्रत्यक्षात वाळवंट, पाणथळ प्रदेश, खारफुटीच्या प्रदेशातली, विविध परिसंस्थांना सामावून घेणारी अभयारण्यं आपलं वेगळेपण राखून असतात. महाराष्ट्रातील वनांमध्ये विपुल जैवविविधता आढळते. या विविधतेचं जतन करणं आपलं कर्तव्य आहे.