Premium|Maheshwari Saree : माहेश्वरी साडीचा राजेशाही वारसा; नर्मदेच्या काठावर फुललेल्या कलापरंपरेची सुंदर ओळख

The Timeless Beauty of Maheshwari Sarees : नर्मदेच्या काठावर फुललेली मध्य प्रदेशची समृद्ध हस्तकला परंपरा आणि जरी, सोन्या-चांदीच्या नाजूक धाग्यांनी सजलेली माहेश्वरी साडी आजही आपल्या कालातीत सौंदर्याने ग्राहकांना आकर्षित करते.
Maheshwari Saree

Maheshwari Saree

esakal

Updated on: 

वर्षा गजेंद्रगडकर

माहेश्‍वरी साड्यांमध्ये होणारा जरीचा आणि सोन्या-चांदीच्या अतिनाजूक धाग्यांचा वापर यामुळे या साड्यांचं नातं प्रारंभापासूनच राण्या-महाराण्यांशी आणि एकूणच सधन व संपन्न वर्गाशी जोडलं गेलं आहे. अर्थात या वस्त्रकलेचं सौंदर्य कालातीत असल्यामुळे आता आधुनिक काळात तिनं ग्राहकवर्गाला मोठ्या प्रमाणात आपलंसं केलं आहे.

सगळ्याच भारतीय नद्या तिथल्या जनसमुदायांसाठी लोकमाता असल्या, तरी गंगा आणि नर्मदेशी केवळ उत्तर भारतच नव्हे, तर संपूर्ण देश विशेष जिव्हाळ्यानं जोडलेला आहे. काठावरच्या विस्तीर्ण प्रदेशांची भौतिक भरभराट करणारी नर्मदा लोकमाता तर आहेच; पण त्याखेरीज, ती जितकी पुण्यप्रद आहे, तितकीच सौंदर्यवतीही आहे. मोजणीपलीकडचं उदंड पुण्य देणाऱ्या तीर्थक्षेत्रांना नर्मदा जशी साथ देत आलेली आहे, तशी ती अपूर्व आणि वैविध्यपूर्ण कलानिर्मितीलाही शतकानुशतकं चेतना देत आलेली आहे. मध्य प्रदेशातल्या माहेश्‍वरकडे या दृष्टीनं पाहायला हवं. एकूणच, मध्य प्रदेशातल्या संपन्न आणि वैविध्यपूर्ण हस्तकला परंपरेला भारतीय वस्त्रोद्योगाच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या हस्तकला वारशाचं एक अत्यंत देखणं प्रतीक म्हणजे ‘माहेश्‍वरी साडी’.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com