
प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे कोकणातील एक निसर्गसंपन्न पर्यटन केंद्र. सुंदर समुद्रकिनाऱ्यांसह मालवणच्या समुद्रातील प्रवाळांची रंगीबेरंगी दुनिया देशभरातून पर्यटकांना आकर्षित करत असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजोड दूरदृष्टीचे स्मारक असणाऱ्या सिंधुदुर्गामुळे अधोरेखित होणारी मालवणची ओळख सागरी अभयारण्यामुळे आता आणखीनच वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे.