

Marathi story book
esakal
कथारूपी दहा पाकळ्यांच्या सुगंधी फुलासारखी पुस्तकाची रचना केली आहे. प्रत्येक कथेचा रंग वेगळा आणि गंध वेगळा आहे. बालकुमार वाचकांचे मनोरंजन करत संस्कार व मूल्यांची शिकवण देणाऱ्या ह्या सदाबहार कथा आहेत. संतोष घोंगडे यांनी रेखाटलेली मुखपृष्ठासह सर्व कथांची चित्रे अतिशय बोलकी आहेत.
एकनाथ आव्हाड हे समकालीन बालसाहित्यातील एक महत्त्वाचे नाव आहे. कथा, कविता, नाट्यछटा, चरित्रे, काव्यकोडी अशा विविध वाङ्मय प्रकारांत त्यांनी विपुल लेखन केले आहे. आव्हाड यांच्या बालसाहित्याची जवळजवळ ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या छंद देई आनंद ह्या पुस्तकाला २०२३चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. मनी वसे ते स्वप्नी दिसे हा त्यांचा बालकथासंग्रह सकाळ प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला आहे. यात दहा टवटवीत बालकथा आहेत.