Premium|Marathi Family Story : हलकेफुलके संवाद, कौटुंबिक अपेक्षा आणि तरुण मनाची धम्माल कहाणी

Humorous Relationship Story : आईच्या लग्नाच्या सूचनांमध्ये, आमोदशी झालेल्या गमतीदार भेटीत आणि नायिकेच्या स्वच्छंदी स्वभावातून तरुणाईच्या भावना, कौटुंबिक अपेक्षा आणि हलक्याफुलक्या विनोदाचा सुरेख संगम उलगडतो.
Humorous Relationship Story

Humorous Relationship Story

esakal

Updated on

मानसी होळेहोन्नूर

इतकं सगळं झाल्यावर आमोदच का? ऋत्विक का नाही? या प्रश्नातला ‘आ’ जरी मी काढला असता, तरी मातोश्रींनी पंजा असा काही मारला असता की मला परत डॉक्टरकडे जावं लागलं असतं. त्यामुळे मी गप्पच बसले. तसंही ती काहीही म्हणो, मी थोडीच तिचं ऐकणार होते. मी इथून वन टू का फोर करायची संधीच तर बघत होते. मला यांच्यासारखं एकाच ठिकाणी आयुष्य काढायचं नव्हतं...

‘‘ते  बघ गोडबोले आजोबा चालायला आलेत म्हणजे नक्की सात पस्तीस झाले असणार, भुले बिसरे गीत संपल्याशिवाय ते काही खाली येत नाहीत.’’

मी एकदम उत्साहानं आईला सांगितलं, तर तिनं मान माझ्याकडे न वळवताच ‘हुं’ असं तिचं नेहमीचं उत्तर दिलं. अगदी व्यवस्थित सावरून ती बसली होती. शाळा सुरू झाल्यामुळे शाळांच्या बसची लगबग सुरू झाली होती. या बसेसमुळे सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच आम्हा सगळ्यांना जाग असायची. काही पालक स्वतःच मुलांना सोडायला जायचे, त्यांच्या गाडीचा हॉर्न अखंड वाजत असायचा. जणू काही हॉर्न वाजवला म्हणजे गाडी विद्युतवेगानं पुढं जाते. यातच सकाळी येणारे दूधवाले, पेपर टाकणारे, भाजीवाले यांचीसुद्धा वर्दळ असायची. क्वचित कधी झोमॅटो, स्वीगीवालेपण असायचे. त्यामुळे मला ही सकाळची वेळ फार आवडायची. सकाळी फिरायला जाणारे ही तर वेगळीच कॅटेगरी. मला तर वाटतं, त्यातले काहीजण आम्ही आमच्या आरोग्याबाबत जागरूक आहोत हे दाखवायलाच फक्त बाहेर पडतात. तर काहीजण चालणं आणि गप्पा दोन्ही एकदम होईल म्हणून चालायला जाणारे असतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com