
दीपाली दातार
पुस्तकातील काही लेखांत लेखिका गावाकडच्या बालपणीच्या आठवणी सांगते; तर काही लेखांत शिक्षिका म्हणून शहरात वावरत असताना आलेले अनुभव सांगते. त्या अनुभवकथनात तिच्या भावविश्वातली माणसे, म्हणजे तिचे आई, वडील, बहीण, मुलगी, मैत्रीण अशी जवळची मंडळी तर आलेली आहेतच; पण त्याखेरीज तिच्या आजूबाजूला असलेला आणि तिला सतत सोबत करणारा निसर्गही लेखनातून डोकावत आहे.