Premium|Marathi Satire : मुलीचे कौतुक, मुलाला मारहाण; पालकांच्या दुटप्पी मानसिकतेवर मार्मिक भाष्य

Marathi Satire and Social Issues : दत्तूभाऊच्या मुलाने वडिलांसारखे वागण्याचा प्रयत्न केल्यावर झालेल्या मारहाणीच्या प्रसंगातून पालकांची मानसिकता, मुलांवरील अपेक्षा आणि समाजातील दुटप्पी वागणुकीवर उपरोधिक भाष्य
Marathi Satire and Social Issues

Marathi Satire and Social Issues

esakal

Updated on: 

प्रसाद नामजोशी

अचानक गावात हालचाल झाली. दत्तूभाऊचा फोटो मिळवायलाच पाहिजे असा साक्षात्कार कार्यकर्त्यांना होऊ लागला. सतत एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर युती, राज्यस्तरावर मैत्रीपूर्ण लढत आणि गाव पातळीवर मात्र जानी दुश्मन असणाऱ्या दोन पक्षांतल्या नगरसेवकांमध्ये दत्तूभाऊचा फोटो कोण पैदा करतं यावरून जुंपली. दोघांनी आपापल्या कार्यकर्त्यांना कामाला लावलं. तेवढ्यात एकाला आठवलं की दत्तूभाऊनं डॉक्युमेंट्रीत काम केलं होतं...

आपलं पोरगं आपल्यासारखं तंट्या होऊन नाचतंय हे बघितल्यावर दत्तूचं मस्तक सरकलं. त्यानं हाती येईल त्या वस्तूनं पोराला बडवायला सुरुवात केली. वस्तूंची कमीही नव्हती, आख्खा आखाडा घरात येऊन पडला होता. अशावेळी जवळच्या मित्रांनी जे करायचं असतं तेच केलं. ढुंगणाला पाय लावून ते आपापल्या घरी गेले आणि घरातच बसून राहिले. दत्तूभाऊच्या पोरानं मात्र मरस्तवर मार खाल्ला. आई हे सगळं निमूटपणे बघत होती.

खरं म्हणजे दत्तूनं त्या दिवशी पोराला मारायचं काहीएक कारण नव्हतं. त्याच्या पोरानं काही विशेष केलं नव्हतं. फक्त त्यानं बापासारखं होण्याचा प्रयत्न केला होता. बरं हे घरोघरी होतंच. म्हणजे आईची साडी नेसून, आईचं मंगळसूत्र घालून लाडकी लेक आई होते आणि तिचं किती कौतुक होतं! तिचे फोटो काढून स्टेटसला ठेवले जातात. त्यावर बदामांचा पाऊस पडतो. पोरगं बापाचा कोट घालतं आणि त्याची बॅग घेऊन ऑफिसला जायला निघतं तर त्याचीही रील्स होतात. आता दत्तूभाऊकडे कौतुकानं मुलाचा फोटो काढायला कॅमेरा नव्हता किंवा त्याच्याकडे जो मोबाईल फोन होता त्यानं फोटो काढता येतील अशी परिस्थितीही नव्हती, तर ठीक आहे. असतात असे गरीब लोक. पण मुलाचं कौतुक करायला, त्याच्या गालावरून हात फिरवायला किंवा त्याच्या डोक्यावर हलकंसं थोपटायला पैसे कुठं लागतात? केलं असतं तोंडदेखलं कौतुक, हसला असता दत्तू फुकटचा आपल्या पोराकडे बघून तर काय बिघडलं असतं एवढं? बेदम मारण्यासारखं काय होतं त्यात? अर्थात हे प्रश्न त्याच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांना पडले नाहीत असं नाही, पण दत्तूभाऊला विचारणार कोण? कारण तो पडला पैलवान गडी. बलभीम आखाड्यातली त्याची रोजची तालीम चुकली नाही. हं, आता त्याचं वय झालं होतं, पण त्याच्याकडे बघून एकेकाळी शे-दीडशे बैठका मारूनच थांबणारं आणि पंगतीत जेवायला बसला तर पाच-पन्नास लाडू पोटात रिचवूनच मग उठणारं हे शरीर आहे हे सगळ्यांनाच माहिती होतं. त्यामुळे त्याला शहाणपणा शिकवणार कोण?

Loading content, please wait...