

Marathi Science Communication
sakal
विज्ञान आपल्याला सारासार विचार करायला शिकवतं. भारतातील सामाजिक समस्यांवरील उपाययोजनांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं, तसंच शोधक-चिकित्सक परिवर्तनशील समाजाची जडणघडण करणं जरुरी आहे. वैज्ञानिक साहित्यामध्ये तसं घडवून आणण्याची क्षमता आहे. आपल्याकडे विज्ञानविषयक लिहिणारे लेखक आणि लेखिका असा सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी निश्चितच सक्षम आहेत. ते विज्ञान-प्रसाराचं कार्य करतील आणि त्यांना नवीन ताज्या दमाचे लेखक येऊन मिळतील. मराठी ज्ञानभाषा व्हावी म्हणून त्याचा नक्कीच उपयोग होईल.