Premium|Marathi Science Fiction Story : २०५० मधील भविष्य, हरवलेले वडील आणि एका टाइम मशिनची अनोखी कहाणी

Time Machine and Family Relationships : वडिलांना शोधण्याची ओढ, काळाचा प्रवास आणि भविष्यकाळातील बदल यांची सांगड घालणारी ही विज्ञानकथा नात्यांचे महत्त्व, आठवणींची ताकद आणि मानवी भावविश्व उलगडते.
Marathi Science Fiction Story

Marathi Science Fiction Story

esakal

Updated on: 

किरण गेडाम, कारंजा लाड, जि. वाशिम

कूपर शांत स्वरात म्हणाला, ‘‘सर, तुमच्या वडिलांचा मृत्यू ठरलेला होता. टाइम मशिन तयार करण्यामागे एकमेव कारण होते, की तुम्हाला तुमच्या वडिलांना शोधायचे होते. जर तुम्ही त्यांना वाचवले असते, तर तुम्हाला आयुष्यात कधी एकटेपणा जाणवलाच नसता. तुमचे वडीलच तुमच्यासोबत असते, तर तुम्ही हे मशिन कधी तयार केले नसते. हे जीवनचक्र आहे, मशिन भूतकाळ बदलण्याची परवानगी देत नाही.’’

घरी पोहोचल्यावर विक्रम, शोभा व अविनाश तिघे गप्पा मारू लागले. शोभा अविनाशला म्हणाली, ‘‘भाऊजी, तुमचा हा आजार तर कमालच आहे. समजा तुम्ही एखाद्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गेलात आणि निवेदकाने तुमचे नाव पुकारून मंचावर स्थानापन्न होण्याची विनंती केली, पण तुम्ही तुमचे नावच विसरलात तर?’’ शोभाचे हे बोलणे ऐकून तिघेही हसू लागले. ‘‘तसे तुम्ही तुमच्या येणाऱ्या बाळासाठी काही विचार केला आहे, विक्रमजी?’’ अविनाशने आपल्या वडिलांच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत विचारले. विक्रम अत्यंत शांत स्वरात म्हणाला, ‘‘मी माझ्या बाळासाठी काही वेगळा विचार करणारा देवाघरचा दूत नाही. मी एक सामान्य माणूस आहे, आणि माझ्या येणाऱ्या बाळाबद्दल माझी एकच इच्छा आहे...’’

२३ जुलै २०५०. पृथ्वीवर प्रदूषण आणि दुष्काळ आता जुन्या गोष्टी झाल्या होत्या. माणसाने प्रगती तर खूप केली होती, पण त्याची मोठी किंमत पर्यावरणाला मोजावी लागली होती. त्या रात्री दहाच्या दरम्यान ५२ वर्षांचा अविनाश आपल्या फ्लॅटच्या गॅलरीत उभा राहून आकाशाकडे पाहत होता. मागून त्याची पत्नी मधू हसत म्हणाली, ‘‘पुन्हा आपल्या बाबांना चांदण्यांमध्ये शोधत आहात का?’’ अविनाशच्या ओठांवर सौम्य हसू उमटले आणि तो म्हणाला, ‘‘एक दिवस मी त्यांना नक्की शोधून काढीन.’’ तेवढ्यात त्यांची २५ वर्षांची मुलगी प्रिया तिथे आली आणि म्हणाली, ‘‘काय चालले आहे मॉम-डॅड?’’ मधू म्हणाली, ‘‘तुझे डॅड चांदण्यांमध्ये त्यांच्या बाबांना शोधत आहेत.’’ प्रियाने अविनाशची गंमत करत विचारले, ‘‘भेटले का मग?’’ अविनाश प्रियाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, ‘‘लवकरच भेटतील.’’

तेवढ्यात खोलीतून संगणक बीप असा आवाज करू लागला. प्रिया हसून म्हणाली, ‘‘डॅड, उद्या तुमचा वाढदिवस आहे आणि एकदा का तुम्ही त्या खोलीत गेलात, की सकाळपर्यंत बाहेर पडणार नाही, म्हणून ॲडव्हान्समध्येच हॅपी बर्थडे.’’ तिने आणि मधूने अविनाशला मिठी मारली. अविनाश दोघींचेही आभार मानून लगेच खोलीत गेला. मधू प्रियाला म्हणाली, ‘‘गेले तुझे डॅड त्यांच्या जगात, आता सकाळीच भेट होईल त्यांची. चल झोपायला.’’ प्रिया म्हणाली, ‘‘मॉम, पण ते आपल्यालासुद्धा त्या खोलीत येऊ देत नाहीत. काय करत असतील आतमध्ये?’’ मधूने उत्तर दिले, ‘‘२० वर्षे झाली, मलाही हाच प्रश्‍न पडला आहे. मी तुला काय सांगू! चल झोपायला, नाहीतर सकाळी उशिरा उठशील.”

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com