Premium|Marathi Short Story : आइस्क्रीम, चहा आणि बरंच काही...

Relationship Story : स्थळ पाहण्याच्या भेटीसाठी आलेल्या अमायाची अनपेक्षितपणे शाळेतील जुन्या क्रशशी भेट होते आणि त्यानंतर घडणाऱ्या घटनांमुळे कथेला उत्सुकतेचे नवे वळण मिळते.
Marathi Short Story

Marathi Short Story

esakal

Updated on

मानसी होळेहोन्नूर

‘‘खरंतर मला यावेळी चहा हवा होता, पण तुझ्या मित्रानं इथं आइस्क्रीम पार्लरमध्ये बोलावलं,’’ अमाया म्हणाली. ‘‘बघ माझा मित्र किती बिझनेस माइंडेड आहे, त्यामुळे चहा, कॉफी घ्यायला दुसरीकडे कुठं जाण्यापेक्षा इथंच बोलावलं तुला.’’ विक्रमनं आपल्या मित्राची बाजू घेतली. ‘‘अरे पण प्रोफाइलमध्ये तर तो आर्किटेक्ट आहे असं लिहिलं होतं, आणि आम्ही फोनवर बोललो तेव्हा या पार्लरबद्दल काहीच बोलला नाही तो...’’

‘‘पहिल्या भेटीत कोणी आइस्क्रीम पार्लरमध्ये बोलवतं का?’’ स्वतःचा वैताग फोनवर मैत्रिणीला ऐकवत अमाया दुकानापाशी जाऊन थांबली. ‘‘खरंतर शनिवारी साडेचार ही काय आइस्क्रीम खायची वेळ आहे का? मान्य आहे उन्हाळा आहे; तरी ते म्हणतात ना चहाला वेळ नसते पण वेळेला मात्र चहा पाहिजे. पण काय करणार? ‘वेळ आणि जागा बदलायची’ यातलं एक अक्षर जरी काढलं असतं तरी आईनं पुढचे चार महिने ऐकवलं असतं. लग्नच करायचं नाही म्हणून सगळे बहाणे वगैरे. आता मला लग्न करायचं नाहीये हा निष्कर्षही तिनंच काढला. आज तर तिनं हाइट केली यार... मला म्हणते, आज ४ तारीख आहे, तू बघत असलेला हा २२वा मुलगा आहे, त्यानं तुला बोलावलंपण आहे चार वाजता, आणि चार तुझा भाग्यांक आहे. त्यामुळे यावेळी नक्की जमणार बघ. त्यावर मी तिला म्हणले, आई चार वाजता नाही साडेचारला बोलावलंय. तर काय म्हणाली माहितीये? पाचच्या आधीची वेळ चारच समजली जाते. मी किती मुलांना भेटले आहे याचा काउंट ठेवला आहे यार तिनं!’’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com