विश्वाचे आर्त । डॉ. सदानंद मोरे
आपली मूलतत्त्वे गुंडाळून ठेवून युरोपातील इंग्लंडादी राष्ट्रांप्रमाणेच विस्तारवादाचे धोरण स्वीकारण्याच्या वाटेने निघालेल्या अमेरिकी राज्यकर्त्यांचा निषेध करण्यात व त्यांना विरोध करण्यात अमेरिकेतील लेखक, विचारवंत व बुद्धिमंत आघाडीवर होते. त्यातील प्रातिनिधिक म्हणून मार्क ट्वेनची चर्चा करताना तेव्हाच्या बौद्धिक वातावरणाचाही परामर्श घ्यायला हवा.
एकट्यादुकट्याने प्रकट केलेले विचार वातावरणनिर्मितीसाठी पुरेसे ठरत नाहीत. त्यासाठी संस्थात्मक पातळीवरही प्रयत्न करण्याची गरज असते.
स्पॅनिश-अमेरिकी युद्धाची परिणती फिलिपिन्सला स्वातंत्र्य मिळण्याऐवजी फिलिपिन्सचा कब्जा स्पेनकडून अमेरिकेकडे जाण्यात होत असल्याची चाहूल लागलेल्या अमेरिकी विचारवंतांनी सरळसरळ ‘American Anti-Imperial League’ या संस्थेची उभारणी केली. १५ जून १८९८ रोजी स्थापन झालेल्या या संस्थेचा पहिला अध्यक्ष होता जॉर्ज बाउटवेल. त्याने संस्थेच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. संस्थेचे सूतोवाच