- प्रतिनिधी
भारताच्या इतिहासाच्या पानापानांमध्ये शौर्यगाथा आहेत. देशाचे संरक्षण आणि सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी जवानांनी सीमेवर दिलेल्या रक्ताच्या आहुतीने ही भूमी पवित्र झाली आहे. या शूरवीरांच्या बलिदानाची आठवण कायम ठेवण्यासाठी उभारलेली युद्धस्मारके देशाच्या अभिमानाची प्रतिके आहेत.
दिल्लीतील भव्य इंडिया गेट असो की लडाखच्या बर्फाच्छादित प्रदेशात अभिमानाने उभे असलेले कारगिल स्मारक असो. ही सर्व स्थळे राष्ट्रभक्तीची जाज्वल्य शक्तीकेंद्रे आहेत. हे केवळ दगड-मातीचे मनोरे नसून, प्रत्येक शिल्प, त्यावर कोरलेले प्रत्येक नाव हे एकेका रणधुरंधराची अमर कहाणी आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील काही प्रमुख युद्धस्मारकांविषयी...