

Men Accessories
esakal
विश्वजीत राळे
आजचा पुरुष फॅशनकडे ‘अभिव्यक्तीचं माध्यम’ म्हणून बघतो आणि अॅक्सेसरी हे त्याचंच एक माध्यम म्हणता येईल. असं म्हटलं जातं, की कपडे माणसाला सजवतात, पण अॅक्सेसरीज माणसाला एक ओळख देतात, त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करतात, त्याला स्टायलिश लुक देतात. ‘ॲक्सेसरीज डिफाइन्स अ मॅन्स स्टाइल’ हेच खरं! फॅशन ही फक्त कपड्यांपुरती मर्यादित नसते, तर त्यात ॲक्सेसरीजचाही समावेश होतो. खरंतर एखाद्या पुरुषाची खरी ओळख त्याच्या अॅक्सेसरीजमधून अधिक स्पष्टपणे दिसून येते. पूर्वी ‘फॅशन’ हा शब्द केवळ महिलांपुरताच मर्यादित होता.