Managing menopausal symptoms naturally with lifestyle : जेवणात आपण कोणतं तेल किती वापरतो यावर बरंच काही ठरतं. तेलामधून अ, ड, ई, क ही जीवनसत्त्वं शरीरात शोषली जातात. स्वयंपाकात एकाच प्रकाराचं तेल कायम वापरू नये. आलटून पालटून वापरावं. शेंगदाणा, तीळ, सूर्यफूल, राइस ब्रॅन, ऑलिव्ह, नारळ यापैकी कोणतंही तेल आपण वापरू शकतो. प्रमाण मात्र लक्षपूर्वक पाळायचं.
बारावीनंतर तीस वर्षांनी कॉलेजच्या गेटटुगेदरला सगळ्या मैत्रिणी गोव्यात भेटल्या होत्या. स्वागत वगैरे झाल्यानंतर हळूहळू छोटे छोटे ग्रुप होऊन गप्पा व्हायला लागल्या. एकमेकींची चौकशी झाल्यावर आजूबाजूच्या सगळ्यांवर नजर फिरली, तसे एकेकीतले बदल जाणवायला लागले.
‘ती बघ किती मॉड झालीये!’, ‘ती तशीच काकूबाई राहिलीये गं!’, ‘अगं ही इतकी का म्हातारी दिसतीये!’, ‘ही किती जाड झालीये ना!’, ‘ही का अशी थकलेली दिसतीये!’ हे ना ते... कॉमेंट्स सुरू झाल्या. बोलता बोलता विषय स्वतःच्या तक्रारींवर येऊन स्थिरावला. ‘मलापण हल्ली जरा डाऊन डाऊन वाटतं गं’, ‘मला तर नीट झोपच लागत नाही’, ‘मला उठावंसच वाटत नाही’, ‘मला सारखा घाम फुटतो गं हल्ली’, ‘जीव घाबरल्यासारखं होतं मला कधीकधी...’ असं आणि बरंच काही...