Premium|Mercury Planet : खगोलातील गमतीजमती...

Mercury Two Birthdays : बुध ग्रहावरील दिवस, वर्ष आणि सूर्योदयाचे गणित पृथ्वीपेक्षा विलक्षण आहे. स्वतःभोवती फिरण्याचा आणि सूर्याभोवती फिरण्याचा वेग यामुळे बुधावर एका वर्षात दोन वाढदिवस येतात.
Mercury Two Birthdays

Mercury Two Birthdays

esakal

Updated on

तन्वी सुषमा परेश

कल्पना करा, अंधाऱ्या रात्री तुम्ही डोंगरमाथ्यावर पहुडले आहात. कुठलाही गोंगाट नाही. काळाकुट्ट अंधार, डोक्यावर असंख्य लुकलुकणारे तारे आणि मनात प्रश्नांचा कल्लोळ! काय असेल तिकडे? कसे निर्माण झाले हे विश्‍व? कसे चालत असेल विश्‍व? खगोलशास्त्राचा अभ्यास करणे खूप रोमांचक आहे. ग्रह-तारे आपल्यापासून खूप दूर आहेत. त्यामुळे त्यांना जीवशास्त्र किंवा रसायनशास्त्रासारखे प्रयोगशाळेत तपासून पाहता येत नाही. तरीही वैज्ञानिकांनी त्याबद्दल महत्त्वाचे शोध लावले ते केवळ निरीक्षणाच्या जोरावर! याच खगोलशास्त्रातील काही गमतीजमती पाहू या...

एकाच वर्षात दोन वाढदिवस!

जगातील प्रत्येक व्यक्ती आपल्या वाढदिवसाची आतुरतेने वाट बघते. प्रत्येकाचा पृथ्वीवर वर्षभरात केवळ एकदाच वाढदिवस येतो. पण बुध या ग्रहावर एका वर्षात दोन वेळा वाढदिवस येतो. पृथ्वीला स्वतःच्या आसाभोवती एक फेरी पूर्ण करायला २४ तास लागतात, तर सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला ३६५ दिवस लागतात. बुधाला स्वतःभोवती फिरायला ५९ दिवस लागतात, तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला ८८ दिवस लागतात. म्हणजेच बुध ग्रहाचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग अत्यंत मंद आहे आणि सूर्याभोवती फिरण्याचा वेग खूप जास्त आहे. बुधाच्या परिवलन आणि परिभ्रमण या दोन्ही गतींच्या विशिष्ट कॉम्बिनेशनमुळे सूर्याला पुन्हा त्याच ठिकाणी येण्यासाठी (एका सूर्योदयापासून पुढच्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी) १७६ दिवस लागतात. या दिवसांच्या हिशेबानुसार बुधावर एका वर्षात दोन वाढदिवस येतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com