विलायती वाचताना : प्रसाद नामजोशी
तिच्या आयुष्यात आला आणखी एक महत्त्वाचा चित्रपट- एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स. हा एक विनोदी चित्रपट होता, त्याची जगभर प्रशंसा झाली. मिशेलनं त्यात मुख्य भूमिका केली होती आणि त्या भूमिकेसाठी तिला गोल्डन ग्लोब आणि ऑस्करसह अनेक पुरस्कार मिळाले. ऑस्कर मिळवणारी ती पहिली आशियाई अभिनेत्री ठरली!
इऑन फिल्म्स, अल्बर्ट ब्रोकोली आणि जेम्स बॉन्ड हे अतूट नातं आहे. डॉ. नो या पहिल्या बॉन्डपटापासून ते गोल्डन आय या सतराव्या बॉन्डपटापर्यंत सर्व चित्रपटांची निर्मिती अल्बर्ट ब्रोकोलीनंच केली. त्याची मुलगी बार्बरा वयाच्या सतराव्या वर्षापासून साहाय्यक म्हणून या चित्रपटांशी संबंधित होती.
१९९६मध्ये अल्बर्टचा मृत्यू झाला आणि बार्बरानं बॉन्डपटांची निर्माती म्हणून इऑन फिल्म्सची जबाबदारी घेतली. निर्माती म्हणून तिचा पहिला आणि एकूण अठरावा बॉन्डपट होता : टुमॉरो नेव्हर डाईज!