Premium|Micronations: सूक्ष्मराष्ट्रांची वाढती संख्या; आंतरराष्ट्रीय मान्यतेचा अभाव आणि धोके काय आहेत.?

self-proclaimed states: गाझियाबाद प्रकरण; सूक्ष्मराष्ट्रांच्या गैरवापराची शक्यता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांची गरज
Micro Nation

Micro Nation

Esakal

Updated on

रोहित वाळिंबे

एखादा भूप्रदेश, जमिनीचा तुकडा किंवा अगदी घराचा परिसरही सार्वभौम आणि स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्याचा प्रकार गेल्या तीन दशकांपासून घडतो आहे. कोणतीही आंतरराष्ट्रीय मान्यता नसलेली अशी स्वयंघोषित सूक्ष्मराष्ट्रे सध्या जगासाठी डोकेदुखी ठरत नसली, तरी भविष्यात तंत्रज्ञानाचा गैरवापर करून लोकांना फसविण्यासाठी अशा स्वयंघोषित पिटुकल्या राष्ट्रांचा वापर होण्याची शक्यता असल्याने, त्यावर वेळीच अंकुश ठेवणे गरजेचे आहे.

आलिशान इमारत... तिच्या परिसरात फडकणारे चार देशांचे ध्वज... याच परिसरात उभ्या असलेल्या आलिशान मोटारी आणि त्या मोटारींवर वाणिज्यदूतासाठी असणाऱ्या विशेष नंबरप्लेट... उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील हे चित्र. कोणालाही आकर्षक वाटेल अशा या चित्रातील रंग, पोलिसांच्या विशेष तपास पथकाने मागील महिन्यात केलेल्या कारवाईमध्ये उडून गेले. वाणिज्यदूत असल्याचे सांगत लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका उच्चशिक्षित व्यक्तीला पोलिसांनी या प्रकरणात ताब्यात घेतले आहे. या ठकसेनाने चार राष्ट्रांचा वाणिज्यदूत असल्याचे सांगत स्वतःच्या बंगल्यातच त्या देशांचा दूतावास सुरू केला होता. पोलिस तपासात ही सर्व सूक्ष्मराष्ट्रे (मायक्रोनेशन्स) असल्याचे उघडकीस आले असून, हा दूतावासही बेकायदा असल्याचे सिद्ध झाले आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर या स्वयंघोषित पिटुकल्या राष्ट्रांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com