
प्रकाश नेवासकर
दुपारी पाऊस पडून गेल्यानंतर मी फिरायला बाहेर पडलो होतो. पावसामुळे डांबरी रस्ता काळाभोर दिसत होता. सहजच लक्ष गेलं, तर रस्त्यावर एक छोटंसं पिवळं पान पडलं होतं. उन्हामुळे ते सोन्यासारखं चमकत होतं. मी जसं त्याकडे पाहत होतो, तसंच तेही माझ्याकडे पाहत आहे, असं मला वाटलं. मी जवळ जाऊन हातातील मोबाईलने त्याचे तीन-चार फोटो काढले आणि सुरू झाला माझा छायाचित्रणाचा प्रवास...