Premium|Modak Recipes : गणपती बाप्पासाठी बनवा चार हटके मोदक; उकडीपासून चॉकलेटपर्यंत सोप्या रेसिपी

Ganesh Chaturthi Modak Recipes : गणेशोत्सवात गणरायाला आवडणाऱ्या मोदकांचे पारंपरिक आणि आधुनिक प्रकार घरच्या घरी करता येतात. उकडीच्या मोदकांसह चॉकलेट, आंबा आणि विड्याच्या पानांचे मोदकही खास पर्याय आहेत.
Ganesh Chaturthi Modak Recipes

Ganesh Chaturthi Modak Recipes

esakal

Updated on

अस्मिता पोकळे

गणपती बाप्पाला मोदक अत्यंत प्रिय, असं म्हटलं जातं. अलीकडच्या काळात पारंपरिक उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांबरोबरच अनेक नावीन्यपूर्ण पण स्वादिष्ट मोदकांचे प्रकार गणरायासाठी प्रेमानं केले जातात. यंदाच्या गणेशोत्सवात करता येतील अशा मोदकांच्या पारंपरिक आणि नव्या रेसिपीज...

उकडीचे मोदक

साहित्य

पारीसाठी ः एक कप तांदळाचे पीठ, १ कप पाणी, १ चमचा तूप, चिमूटभर मीठ.

सारणासाठी ः एक कप ताजा नारळ, पाऊण कप गूळ, अर्धा चमचा वेलची पूड, चिमूटभर जायफळ पूड,

१ चमचा खसखस.

कृती

कढईत पाणी, तूप आणि मीठ घालून उकळून घ्यावे. उकळी आल्यावर त्यात तांदळाचे पीठ घालून लगेच ढवळावे. झाकण ठेवून दोन मिनिटे वाफ येऊ द्यावी. मिश्रण गरम असतानाच मऊ मळून घ्यावे. सारणासाठी नारळात गूळ घालून मिश्रण मंद आचेवर शिजवावे. त्यात वेलची, जायफळ व खसखस घालावी. उकडीचा छोटा गोळा घेऊन त्याला हाताने वाटीचा आकार द्यावा. त्यात सारण भरून पाकळ्या पाडत मोदक बंद करावा. मोदकांना तुपाचा हात लावून मोदकपात्रात दहा ते वीस मिनिटे वाफवून घ्यावेत.

चॉकलेट मोदक

साहित्य

दोन चमचे कोको पावडर, २ चमचे चॉकलेट चिप्स, १ कप डेसिकेटेड कोकोनट, अर्धा कप खवा, अर्धा कप पिठीसाखर, २ चमचे मिल्क पावडर, अर्धा चमचा वेलची पूड,

१ चमचा तूप.

कृती

कढईत तूप घालून मावा आणि डेसिकेटेड कोकोनट मंद आचेवर परतून घ्यावे. गॅस बंद करून मावा थोडा थंड होऊ द्यावा. त्यात पिठीसाखर, कोको पावडर, मिल्क पावडर आणि वेलची घालावी. सर्व मिश्रण एकजीव करून त्यात चॉकलेट चिप्स मिसळाव्यात. मिश्रण मोदकाच्या साच्यात भरून घट्ट दाबावे. साच्यातून बाहेर काढल्यानंतर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून मोदक सेट करावेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com