Premium|Summer Drink Recipes : उन्हाळ्यातील रंगीबेरंगी, थंडगार मॉक्टेल्स आणि कूलर्स; घरच्या घरी बनवा ताजेतवाने समर ड्रिंक्स

Summer Drink Recipes : आजच्या बदलत्या जीवनशैलीत फळांची ताजगी आणि कल्पक सादरीकरण यांचा संगम असलेली मॉक्टेल्स, कूलर्स आणि मिल्कशेक ही पेये आधुनिक पेयसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनली असून, उन्हाळ्यातील तहान भागवण्यासाठी ती चविष्ट आणि आरोग्यदायी पर्याय ठरत आहेत.
Summer Drink Recipes

Summer Drink Recipes

esakal

Updated on

मृणाल तुळपुळे

आजच्या बदलत्या जीवनशैलीबरोबर आपल्या पेयसंस्कृतीत काही बदल झाले आहेत. कूलर्स, शेक्स आणि मॉक्टेल्स ही आजच्या पेयसंस्कृतीचा अविभाज्य भाग झाली आहेत. या पेयांमध्ये फळांची ताजगी, बर्फाचा थंडावा, हर्ब्जचा सुगंध आणि कल्पक सादरीकरण यांचा सुरेख संगम दिसून येतो. त्यामुळेच घरगुती स्वयंपाकघरापासून ते आधुनिक कॅफे आणि पार्टीजपर्यंत या पेयांची वेगवेगळी रूपे आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या काही वर्षांत या पेयांची लोकप्रियता खूपच वाढली आहे.

मॉक्टेल्स

उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणारी, डोळ्यांना मोहवणारी आंबट-गोड चवीची पेये म्हणजे मॉक्टेल्स. थंडगार मॉक्टेलचा सजवलेला ग्लास बघूनच उन्हाळ्याची निम्मी तीव्रता कमी होते आणि ते प्यायल्यावर एकदम ताजेतवाने आणि प्रफुल्लित वाटायला लागते. बरेच वेळा मॉक्टेल्स आणि कॉक्टेल्समध्ये मात्र गल्लत केली जाते.

फळांचा रस, शीतपेये व हर्ब्ज यांचे अल्कोहोल घालून केलेले मिश्रण म्हणजे कॉक्टेल. कॉक्टेल संस्कृतीमध्ये अल्कोहोल न घेणाऱ्या लोकांना फळांचा रस किंवा शीतपेयावर समाधान मानावे लागते. यातूनच मॉक्टेल्सचा उगम झाला व अल्कोहोल सोडून इतर सर्व घटक वापरून केलेले पेय ‘मद्यविरहित कॉक्टेल’ किंवा ‘व्हर्जिन कॉक्टेल’ म्हणून ओळखले जाऊ लागले. याच पेयाला कालांतराने मॉक्टेल हे नाव पडले व तेच नाव आज प्रचलित आहे. मॉक्टेलमधील ‘मॉक’ या शब्दाचा अर्थ नक्कल करणे किंवा अनुकरण करणे असा होतो. त्यामुळे कॉक्टेलचे अनुकरण करून केलेले मद्यविरहित पेय म्हणजे मॉक्टेल, असे म्हटले जाते.

फळांचा रस, शीतपेये, फळांचे तुकडे, हर्ब्ज ह्या सर्वांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून मॉक्टेल्स केली जातात. ती काचेच्या ग्लासमध्ये घालून फळांच्या तुकड्यांनी किंवा हर्ब्जनी नटवली जातात. अशा प्रकारे तयार केलेल्या मॉक्टेल्सचे वेगवेगळे रंग, त्याचा स्वाद आणि चव सगळेच उन्हाळ्यात मनाला आनंद व ताजगी देणारे असतात. म्हणूनच मॉक्टेल हे उन्हाळ्याच्या दिवसांत ब्रंच, दुपारच्या जेवणाच्यावेळी, संध्याकाळी अथवा रात्रीच्या जेवणाआधी अशा दिवसाच्या कोणत्याही वेळी सर्व्ह करण्यासाठी अतिशय योग्य असे पेय आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com