

Monsoon Fashion Tips
esakal
सोनिया उपासनी
पावसाळा हा फॅशनला मर्यादा घालणारा नाही, तर नव्या प्रयोगांची संधी देणारा ऋतू आहे. योग्य फॅब्रिक, हवामानाला अनुरूप फुटवेअर, ट्रेंडी रंग आणि ॲक्सेसरीजची योग्य काळजी घेतल्यास तुम्ही या हंगामातही स्टायलिश आणि कॉन्फिडंट दिसू शकता. फॅशनसोबतच स्वच्छता, आराम आणि सुरक्षितता यांनाही तितकेच महत्त्व द्यावे.
पावसाळा म्हणजे निसर्गाची हिरवाई, गारवा आणि प्रसन्न वातावरण. या ऋतूत फॅशन करताना केवळ स्टायलिश दिसणे पुरेसे नसते, तर आरामदायी, टिकाऊ आणि हवामानाला अनुरूप कपड्यांची निवड करणेही तितकेच महत्त्वाचे असते. योग्य फॅशन सेन्स आणि साध्या पण महत्त्वाच्या खबरदारीनेही तुम्ही पावसाळ्यात आकर्षक दिसू शकता. त्यासाठी आत्मविश्वासही महत्त्वाचा आहेच. चला तर मग, जाणून घेऊ या, मॉन्सूनसाठी फॅशन कशी करावी, यंदाचे ट्रेंड्स कोणते आहेत आणि ॲक्सेसरीजची काळजी कशी घ्यावी...