Premium|Monsoon Memories : जिभेवर उतरणारा पाऊस

Rain Nature Experience : पावसाळा केवळ ऋतू नसून आठवणी, निसर्ग, सुगंध आणि भावनांचा उत्सव आहे. प्रत्येक सरीसोबत मनाला भिजवणाऱ्या अनुभवांचा आणि ग्रामीण सौंदर्याचा हा भावस्पर्शी प्रवास उलगडणारा लेख.
Monsoon Memories

Monsoon Memories

esakal

Updated on

मंगेश साखरदांडे

प्रत्येक गावातून बाहेर जाणाऱ्या वाटेवर बहुधा पावसाळ्यात मिनी-माथेरानं उगवलेली असतात. उभ्या-आडव्या घाटवाटांतून पाऊस झेलीत हिंडण्याइतकं नशीब जोरावर असेल, तर चिंब भिजवणारा पाऊस, दऱ्यांतून वर येत लपेटून टाकणारे ढगांचे पुंजके, हिरव्या रंगाच्या असंख्य छटा आणि कुरकुरीत भज्यांच्या आधी नाकाशी रेंगाळणाऱ्या गंधांचं आणि मग जिभेवर रेंगाळणाऱ्या खमंग चवीचं दुसरं नाव म्हणजे स्वर्गीय आनंद...!

हा पाऊस कधीच एकटा येत नाही. असंख्य गोष्टी आणतो तो स्वतःबरोबर. खळाळणारे झरे, धबाबा धावणारे धबधबे, हरित तृणांच्या मखमालीचे हिरवेगार गालिचे तो आणतोच आणतो; पण असंख्य आठवणीही आणत असतो तो बरोबर... ओल्याकंच. सुखावणाऱ्या. ‘अजून आठवेऽऽ...’ची सय जागवणाऱ्या. काही गहिऱ्या, मनाच्या तळाशी रुतून बसलेल्या. काही नकोशा, काही शेवाळलेल्या आणि सरदलेल्याही.

पाऊस आणखीही काय काय आणतो... भुरभुरणारा, झिमझिमणारा, टपटपणारा, कोसळणारा, अवखळ, नाचरा, लडिवाळ, बेभान पाऊस प्रत्येक थेंबाबरोबर मातीचा वेड लावणारा गंध आणतो. मग कल्पनांबरोबर उन्हाळाभर कोरड्या मातीचं पांघरूण ओढून शांतपणे पहुडलेल्या असंख्य बियांना धुमारे फुटतात, कवींना कविता होतात; लहान-लहान बेडकं उड्या हाणायला लागतात (ही हल्लीच्या शहरांमधल्या चकचकीत स्टारमस्टार कॉम्प्लेक्सांच्या ओपन स्पेसेसमधूनही दिसतात); बाल्कनीतल्या कुंड्यांतून रात्रभर झोपलेल्या गोगलगायांची हजेरी त्यांनी ओढलेल्या चंदेरी रेषांमधून जाणवायला लागते... आणखीही खूप काही घडत असतं आसमंतात!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com